मुंबई : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती खुद्द कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. परंतु सध्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशिवाय विमानतळाचं उद्घाटन केले जाईल, असं राणे म्हणाले होते. या उद्घाटन कार्यक्रमावरुन मोठा राजकीय वाद पेटला होता. आता नारायण राणेंनी आज पुन्हा या उद्घाटनाबाबत भाष्य केलं आहे.
येत्या ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच करु, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यापूर्वी उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित असावेत असे काही नाही, असे राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर आता नारायण राणे यांचे सूर बदलले असल्याचं म्हटले जात आहे.
दरम्यान, नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत म्हटले होतं की, मी ज्योतिरादित्य सिंधियांना भेटलो आणि विमानतळ उद्घाटनाची वेळ घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावणार का? यावर राणेंनी म्हटलं होतं, ‘मुख्यमंत्री पाहिजेत असं नाही’. राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेने भाजपवर टीका सुरू केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला
- शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन गावातच स्विकारा, पालकमंत्र्यांच्या सूचना
- लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या सरकारकडून होतंय; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
- ‘कोथरूडकरांच्या ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा गोरखधंदा सत्ताधारी भाजपने सुरू केला आहे’
- यशोमती ठाकूर यांनी केली भिक्षेकरी गृहातील वृद्धांची आस्थेनं चौकशी; समस्या सोडवण्याचे दिले आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
