🕒 1 min read
मुंबई : गणपतीसाठी कोकणात जाण्याची ओढ सध्या चाकरमान्यांना लागली आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवासाठी ‘मोदी एक्सप्रेस’ धावणार आहे. अशी माहिती भाजप आमदार नितेश राणे यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे. २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादरच्या प्लॅटफॉर्म नं. ८ वरून ही एक्सप्रेस सुटेल. ही एक्सप्रेस दादरवरून कणकवलीला जाणार असून मध्ये वैभववाडीत थांबणार आहे.
“या एक्सप्रेसमध्ये एकवेळचे जेवण मिळणार आहे. तसेच आरतीचं पुस्तकही भेट देण्यात येईल. गाडीचे तिकीट मिळवण्यासाठी कणकवली, देवगड, वैभववाडीच्या तालुका अध्यक्षांना संपर्क साधायचा आहे.”, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- Sunil Raut | ज्यांनी ज्यांनी पक्ष सोडला त्यांना बाळासाहेबांची हाय लागली आहे – सुनील राऊत
- Manisha Kayande | सावित्रीच्या लेकी म्हणायचं मग ही काय तुमची सावत्र लेक आहे का? – मनीषा कायंदे
- Ramdas Kadam । अजित पवार हे चांगले विरोधी पक्षनेते, त्यांना कायम विरोधी पक्षनेता राहण्यासाठी शुभेच्छा; रामदास कदमांचा टोला
- Ramdas Kadam । बाळासाहेब जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत गेली असती का? रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Kirit Somaiya | पुढच्या नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये मेट्रो रुळावर धावेल – किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
