🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीने विजय मिळवत विजयी सलामी दिली आहे. कर्जत तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. पाचपैकी तीन ग्रामपंचायतींवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये 17 पैकी 13 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंचपद शिवसेनेकडे आले असून कर्जत तालुक्यातील उमरोली आणि जामरूख ग्रामपंचायतीवर शिवसेनेकडे आल्या आहेत. यामुळे कर्जत तालुक्यात आज भगवं वादळ आल्याचं चित्र यानिमित्ताने पाहायला मिळालं आहे.
कर्जत तालुक्यातील शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्याचे काम गेल्या काही दिवसांत केले होते. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर हे देखील प्रचारात उतरले होते. त्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले होते.
महत्वाच्या बातम्या
-
नेते पक्ष सोडून जात असले तरी कार्यकर्ते मात्र खंबीर आहेत : रोहित पवार
-
‘गरज पडेल तेव्हा भाजप पवारांचाचं सल्ला घेतं, निवडणुकीत मात्र त्यांनाचं लक्ष्य करत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
