🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जनसंपर्क साधण्यासाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेतील दुसऱ्या टप्प्याची सांगता रविवारी सोलापुरात झाली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही नेतेमंडळी उपस्थित होती.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश सुरु आहेत. आम्ही चंद्रकांत पाटलांना माझ्यासारखे लोकं व्यवस्थित प्रवेश घ्या असं सांगत आहेत. भाजपने जर प्रवेशासाठी पूर्ण दरवाजे उघडले तर शरद पवार यांची राष्ट्रवादी दिसणार नाही. तसेच कॉंग्रेसमधेही पृथ्वीराज चव्हाणचं उरतील असं टोला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे.
तसेच पुढे बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी शरद पवार तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुमच्या कामाचा हिशोब द्या. फडणवीस यांनी हिशोब दिला आहे. मात्र, तुम्ही पंधरा वर्षात महाराष्ट्राला काय दिलं, याचा हिशोब द्या, असं आव्हान शाहांनी पवारांना दिलं. त्यामुळे शरद पवार शाह यांच्या टीकेला कसे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अमित शाहांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच येत्या काही दिवसांत इतरही अनेक नेते भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत.
- देशाच्या राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न भाजप सरकारकडून सुरू आहेत : बाळासाहेब थोरात
- … तर उदयनराजे भाजपमध्ये जाणार नाहीत
- भाजपात आले तरी राणा पाटलांना विधानसभा निवडणुकीत धोकाचं !
- शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

