Share

लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करा : अमित देशमुख

Published On: 

🕒 1 min read

लातूर : लातूर-पुणे दरम्यान वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस ही नवी रेल्वेगाडी तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी शुक्रवारी (ता. 30) रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे. लातूर रेल्वेच्या संदर्भातील विविध प्रश्नही यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडले.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली लातूर-मुंबई रेल्वे बिदरपर्यंत विस्तारित करण्यात आल्याने लातूर येथील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. या मार्गावर अन्य गाडी नसल्याने लातूर-मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात यावी. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता या रेल्वेला अतिरिक्त बोगी जोडण्यात याव्यात, ही या भागातील जनतेची मागणी आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थींचे जतन करण्यात आले आहे.

या चैत्यभूमीला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सर्व जलद रेल्वेगाड्यांना रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. लातूर येथे उभारण्यात येत असलेल्या कोच फॅक्टरीचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे. या फॅक्टरीच्या कामाला गती देण्याबाबत आणि या कारखान्यात लातुरातील अधिकाधिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत आपण लक्ष घालावे, अशी विनंतीही आमदार अमित देशमुख यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!