टीम महाराष्ट्र देशा : भाजप सेना युतीबाबत मी काही बोलणार नाही. युतीबाबत जो काही निर्णय झाला आहे. तो मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झाला आहे. त्यामुळे युतीबाबत दोन्ही पक्षाचे प्रमुखचं बोलू शकतील. मी त्यांच्या समोर खूप लहान आहे, असे म्हणत शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युतीचा निर्णय दोन्ही पक्ष प्रमुख घेतील असे सांगितले.
जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज सुरवात झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरेंना युती बाबत प्रश्न करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या वेळी युती जाहीर करताना जी पत्रकार परिषद झाली होती त्यात सर्व काही स्पष्ट करण्यात आले होते, तसंच आमची युती सत्तेसाठी नव्हे तर मुद्द्यांसाठी आहे असं देखील आदित्या यांनी म्हटलं. तसेच उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला पेपर मी सध्या फोडणार नाही, निवडणूक लढवायची की नाही, निवडणूक कुठून लढवायची हे अजून निश्चित झाल नाही. जनता जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान भाजप – सेना सत्ता आली तर आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल असे शिवसेनेकडून वारंवार सांगितल जात आहे. तसेच आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या दृष्टीने महत्वाची असल्याचं बोललं जात आहे. त्या दृष्टीनेचं आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करत असल्याचं दिसत आहे.
- धनंजय मुंडेंची भाषण मोठमोठी पण ऐकायला काळंं कुत्रही नाही : देवेंद्र फडणवीस
- इंदापूरच्या जागेबाबत निर्णय घेऊ शकत नाही, मी केवळ पक्षाचा एक मावळा : खा. कोल्हे
- ‘सुळे निवडून आल्या तर इव्हीएम चांगलं आणि मुंडेंच्या मुली जिंकल्या तर मशीन खराब’
- विरोधी पक्षांचे १७ आमदार भाजप प्रवेशासाठी रांगा लावून उभे, दानवेंची धक्कादायक माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
