🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील तसेच कॉंग्रेसमधील अनेक नेते भाजप आणि सेनेची वाट धरत आहेत. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच युतीचे सरकार पुन्हा येण्याचा अंदाज आल्याने अनेक मंडळी पक्ष सोडत आहेत. कॉंग्रेस पक्षापेक्षा जास्त गळती राष्ट्रवादीला लागली असून नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीने भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणावरून टीका केली आहे. तर या टीकेला प्रत्युत्तर भाजपकडून देखील दिले गेले आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांवर टिका करण्यासाठी काहीच उरले नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेला भावनिक करण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली असल्याची टीका भाजपाचे नेते राजेंद्र मस्के यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे .
दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार यांनी नुकतीच घोषणा केली की, यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नव्हे तर दोन झेंडे असतील. दुसरा झेंडा हा भगवा असून त्यावर शिवाजी महाराजांची आकृती असेल. हा सर्व प्रकार म्हणजे भावनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याचे मत राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील अनेक बडे नेते सध्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. कारण त्यांना कळून चुकले आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार स्वप्नातही सत्तेत येऊ शकत नाही. गावच्या सरपंचापासून ते आमदार, खासदारापर्यंत सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करण्यसाठी एका पायावर रांगेत उभे आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात पोटसुळ उठणे स्वाभाविकच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
-
धनंजय मुंडेंना पंकजाताई, प्रितमताई नाही, तर सुरेश धस पुरेसे आहेत : मुख्यमंत्री
-
कर्जत-जामखेडला विकासाच्या बाबतीत राज्यात एक नंबर बनवणार : रोहित पवार
-
सत्ता असताना काही केलं नाही, आता कसल्या यात्रा काढता ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
