🕒 1 min read
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. विजयसिंह मोहिते पाटील, सचिन आहिर, चित्रा वाघ, मधुकर पिचड यासारख्या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. माण खटाव तालुक्याचे युवा नेते शेखर गोरे यांनी मुंबई येथे ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर शिवसेनेत प्रवेश केला.
शेखर शिवसेनेत गेल्याने माण खटावच्या राजकारणात भूकंप झाला असून समीकरणे बदलली आहेत. शेखर गोरे यांना माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे तिकीट देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
काल उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून व खांद्यावर भगवा ध्वज देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी नितीन बानुगडे-पाटील, दगडूदादा सपकाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. गोरे यांनी काही दिवसांपूर्वी फलटणमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत खुद्द शरद पवार यांच्या समोर राडा घातला होता. पक्षातील कोणीही पवारांच्यापुढे मोठ्या आवाजाने बोलण्याची हिम्मत करत नसताना गोरे यांनी घातलेला राडा गाजला होता.
शेखर गोरे हे माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचे भाऊ आहेत, गोरे यांनी आपल्याच भावाच्या विरोधात जात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडे बहुमत असताना देखील गोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता. पक्षातील गटबाजीमुळेच आपण पराभूत झाल्याचा आरोप यावेळी यांनी यापूर्वी केला होता.
पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा, प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे करणार पूरग्रस्त भागाची पाहणी
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात – मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

