Share

मुंडे साहेबांनी वैद्यनाथ कारखान्याला काळजाप्रमाणे जपलं, पण त्यांच्याच वारसदारांनी शेतकऱ्यांना लुटले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, सत्ताधारी भाजप – शिवसेनेच्या यात्रां पाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे.

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी वैद्यनाथ कारखान्याला आपल्या काळजाप्रमाणे जपलं, आज त्यांचाच वारसदारांनी कारखान्याची दशा केली आहे. विश्वासाने मतांचे आंदण दिले त्याच शेतकऱ्यांना यांनी लुटले, असा घणाघात धनंजय मुंडे यानी केला आहे.

दुष्काळात ऊस जळत असताना लोकप्रतिनिधींनी राजकारण करत शेतकऱ्याचं मन जाळलं. जाणीवपूर्वक वैद्यनाथ कारखाना उशीरा सुरू केला, ऊस उचलीसाठी पक्षभेद केला. निसर्ग कोपलेला असताना ऊसाची बिलं थकवली. आजही लोकांना पैसे मिळालेले नाही. आता निवडणुकांपूर्वी शे-दोनशे देऊन परळीकरांना लालूच देतील. मात्र भावनिक राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन यावेळी मुंडे यांनी केले.

परळी, अंबाजोगाई वगळता बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात पिकविमा मिळाला. मग आम्ही काय गुन्हा केला आहे? इथले लोकप्रतिनीधी जाणूनबुजून असा भेदभाव करत आहेत. दुष्काळचे सावट असताना या तालुक्यांना असं वाऱ्यावर सोडणं यांना शोभतं का? आमच्यावर हा का अन्याय केला? हा जाब आम्ही विचारणारच, असही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

विश्वनाथ म्हाडेश्वारांवर तत्काळ 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा : रुपाली चाकणकर

राज्यातल्या महाविद्यालयांमधल्या निवडणुका लांबणीवर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!