टीम महाराष्ट्र देशा : राज्यावर नैसर्गिक जलआपत्ती ओढवली असताना अनेक नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत पुरात अडकलेल्या जनतेचा स्वतः पाण्यात उतरून बचाव करत आहेत. जनते प्रति असलेली आपली खरी भूमिका सदाभाऊ खोत पार पडत आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर सदाभाऊ खोत यांचे कौतुक केले जात आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला पूर आला आहे. नदी काठचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीने 54 फूट पाणी पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील वाळवा, पलूस, शिराळा या तालुक्यात पूर आला आहे. या पुरात हजारो लोक अडकले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या टीम बरोबरच राजकीय नेतेही पाण्यात उतरले आहेत.
वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने ज्या ठिकाणी लोक अडकले आहेत तिथे बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु आहे. या बचाव कार्यात खुद्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कालपासून स्वतः पाण्यात उतरले आहेत. काल त्यांनी वाळवा तालुक्यातील शिगाव येथे पूरपरिस्थितीची पाहणी करत जे लोक अडकले आहेत, त्यांना स्वतः बोटीत बसवून सुरक्षितस्थळी हलवले. तर आज देखील सदाभाऊ सकाळपासून पाण्यात उतरून मदत करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
