Share

चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला घातल्या गोळ्या, पोलीस अधिकाऱ्याचं देशभरातून कौतुक

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : कदाचित आत्तापर्यंत बलात्कार करणाऱ्या आरोपीला तुम्ही गोळ्या घातलेल्या पाहिलं नसेल. मात्र, उत्तर प्रदेशात 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केलेल्या आरोपीला गोळ्या मारुन अटक केली. ही कामगिरी केलीय IPS अजय पाल शर्मा यांनी, त्यांच्या या कामगिरीचे कौतुक देशभरातून केलं जात आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शर्मा यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. नाजील असं आरोपीचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

…हे आहे प्रकरण

6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि खून केल्याचा आरोप आरोपी नाजीलवर आहे. गेल्या शनिवारी एका मुलीचा मृतदेह पोलिसांना मिळाला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी सिविल लाईन्स विभागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी पपोहचले असता, पोलिसांना पाहून आरोपीने गोळीबार केला. पोलिसांनीही आरोपीवर गोळीबार केला. यावेळी त्याला गोळी लागताच तो जमीनीवर कोसळला आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!