Share

मराठ्यांच्या वागण्यामुळे मन दुखावलं – पायल रोहतगी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  बॉलीवूड अभिनेत्री पायल रह्तोगीने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केल. यावेळी पायलने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छ. शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शुद्र जातीत झाल्याचं’ तिने म्हटलं आहे. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण का दिलं ? असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांमधून टीका होत आहे.

पायलवर होणाऱ्या टीकेनंतर तिने या सगळ्याचं खापर मराठी माणसावर फोडलं आहे. मराठी माणसाच्या टीकेमुळे माझ मन दुखावलं गेलं असल्याचं ट्विट पायल रोहतगीने केलं आहे.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1135466148399595520

पायल रोहतगीने ट्विटरवर छ.शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करून हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शुद्र जातीत झाला होता”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही पोस्ट शेअर केली आहे. यापूर्वीही पायल अशाच वादामुळे चर्चेत आली होती.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1135370622437978117

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!