Share

…त्यातूनचं वंचित आघाडी भाजपची ‘टीम बी’ असल्याचे दिसून आले – नाना पटोले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप, आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रचार साहित्य सारखेच होते. त्यातूनच वंचित आघाडी भाजपची ‘टीम बी’ असल्याचे दिसून आले. असे नागपूर लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

निवडणूक कामात अडथळे आणल्याप्रकरणी नाना पटोले तसेच कॉंग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकर परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर निशाणा साधला लोकसभा निवडणुकीत भाजपचे आणि वंचित बहूजन आघाडीचे प्रचार साहित्य सारखेच होते. त्यावरून वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘टीम बी’ असल्याचे दिसून येत आहे. असे पटोले यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, वंचित बहुजन आघाडीच्या मागे ‘मास्टरमाईंड’ कोण आहे याच विचार करावा असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, बोलताना पटोले यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला. महाजन यांना जळगाव जिल्ह्यातील दुष्काळ निराकरणाच्या अर्थसंकल्पाच्या निधीची माहिती नाही. त्यांना उत्तर देण्यासाठीच मी राजकीय संन्यासाचा ‘जुमला’ मांडला. गिरीश महाजन हे फोकनाड नेते आहेत. असे त्यांनी म्हंटले.

तसेच, नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केली. पक्षश्रेष्ठींनी राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तर ती स्वीकारण्याची माझी तयारी आहे. असे वक्तव्य त्यांनी केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!