Share

पवारांना नामोहरम करून सुजय विखेंनी घेतला आजोबांच्या पराभवाचा बदला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नगर दक्षिण मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी तब्बल अडीच लाख मतांनी विजय मिळवला आहे. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला आहे. मुळात हा पराभव संग्राम जगताप यांचा नसून शरद पवारांचाचं असल्याची भावना विखेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

सुजय विखे यांनी 30 वर्षापूर्वी झालेला आपले आजोबा बाळासाहेब विखे यांच्या पराभवाचा बदला घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजोबांबाबत बोलल्याने नाराज झालेल्या सुजय विखे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.

काय होता पवार-विखे वाद ?

१९९१ ची लोकसभा निवडणूकत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद अगदीच विकोपाला गेला. कॉंग्रेसकडून या जागेवर सरळ दावा होता त्याकाळचे मातब्बर नेते बाळासाहेब विखे यांचा. मात्र शरद पवार यांनी त्यावेळी विखेंच तिकीट कापण्यात आपल सगळ राजकीय वजन वापरलं. आणि कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली सोनईच्या यशवंतराव गडाख यांना. त्यामुळे बाळासाहेब विखे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले.

त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला.

शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्याविरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले. हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाखांना सहा वर्षं निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं.

“निवडणुकीत भाषण करताना उत्तरेतील जित्राबं दक्षिणेत येतील… पैसे देतील, सायकल देतील (विखे पाटील यांचं निवडणूक चिन्ह सायकल होतं) ते घ्या पण मतं कॉंग्रेसच्याच उमेदवाराला द्या, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यावरून आचारसंहिता भंग झाला. तसंच बदनामी केली या आरोपांचा खटला विखे यांनी गडाख आणि शरद पवार यांच्यावर केला. त्यावेळी कोर्टाने गडाख यांना ६ वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली होती, तर शरद पवार यांच्यावर ठपका ठेवून नोटीस काढली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!