Share

पुण्यात कॉंग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, शेवटी मलाच लक्ष घालावं लागलं : गिरीश बापट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यात कॉंग्रेसला शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार मिळत नव्हता पण शेवटी मलाच लक्ष घालावं लागलं असा दावा पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. आज चाकण येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी गिरीश बापट यांनी कॉंग्रेसकडून पुण्याच्या उमेदवारी बाबत झालेल्या दिरंगाईवर भाष्य केले. ते म्हणाले की, शेवटचा दिवस उजाडला तरी पुणे मतदासंघासाठी कॉंग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, शेवटी मलाच लक्ष घालावं लागलं असा दावा बापट यांनी केला. ते पुढे म्हणाले की, शिरूर मतदारसंघात आमचे मित्र विलास लांडे या बुवा  माणसाला राष्ट्रवादी कॉंग्रेसवाल्यांनी फसवल आहे. तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांना निवडणुका लागल्या की, आजारपण येतं असा टोला बापट यांनी लगावला आहे.

दरम्यान यंदा शिरूर लोकसभा मतदार संघात चांगलीच चुरस पाहिला मिळणार आहे. भाजप – सेना युतीकडून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कडून अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्यात शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून जोरदार प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!