🕒 1 min read
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. हा ठराव दाखल करताना प्रविण दरेकर यांनी निलम गोऱ्हे यांच्यावर आरोप केले आहेत.
उपसभाती यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. विधान परिषदेत सभागृहाचा विश्वास गमावला आहे त्यामुळे हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपातीपणा करत आहेत. त्यामुळे आम्ही सभापतींना ठराव दिला, अशी माहिती प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास विधानपरिषदेत गोंधळ होऊन परिषदेचे कामकाज तहकुब करण्यात आले होते. ज्या लक्षवेधीवरून गोंधळ झाला त्या अकोला महापालिकेतील गैरकारभार, भ्रष्टाचार यामुळे अकोला महापालिका शासन तत्काळ बरखास्त करण्यात यावे अशी लक्षवेधी गोपिकिशन बजोरिया यांच्याकडून मांडण्यात आली होती. अकोला महापालिकेतील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे याविषयावर लक्षवेधी घेऊ नये असे प्रविण दरेकरांचे म्हणणे होते.
उपसभापतींनी विधीमंडळाच्या नियमानुसार ही लक्षवेधी मांडली जाऊ शकते, न्यायालयातील निर्णयावर येथील चर्चेचा परिणाम होणार नाही याची काळजी घेऊ, असे निलम गोऱ्हे यांनी म्हणाल्या. या विषयावर बोलू न दिल्याने प्रविण दरेकर यांनी निलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुढील तारीख लवकरच होणार जाहीर
- तुम्हाला ते जमलं नाही निदान नाच्याचं काम तरी नीट करा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार
- नारायण राणेंकडून भास्कर जाधवांना ‘नाचा’ची उपमा
- “आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली?”
- कोण अजित पवार? मी नाही ओळखत; नारायण राणे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

