🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे. दरम्यान, ट्विटच्या माध्यमातून भाजप आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे.
भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’जो हार कर भी जीतते है वो, बाजीगर कहलाते है…’,’तसेच यासोबत त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेले ट्विटही जोडले आहे. अमरिंदर आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत की,’उत्तम बातमी! प्रत्येक पंजाबीच्या मागण्या मान्य केल्याबद्दल आणि गुरुनानकजयंतीच्या पवित्र प्रसंगी 3 काळे कायदे रद्द केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. किसानीच्या विकासासाठी केंद्र सरकार यापुढेही काम करत राहील याची मला खात्री आहे.’
जो हार कर भी जीतते है
वो बाजीगर कहलाते है… https://t.co/7QIvo6Pztb— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 19, 2021
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्याची घोषणा केल्यानंतर या कायद्यांना प्रचंड विरोध झाला. शेतकरी संघटनांनी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लेच्या सीमेवर ठिया मांडला होता. केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या नाही तर फक्त मूठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. तसेच अनेक राज्यांनी हे कायदे लागू करण्यासाठी विविध बदल सुचवत नकार दिला होता.
दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारने घाईघाईने लादलेल्या तीन कृषी कायद्यांत किमान हमी भावाची तरतूदच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल भावाने विकला जाऊन यातून फायदा व्यापाऱ्यांचा होणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या अशा बाजार समित्यांच्या अस्तित्वावरही घाला येणार आहे.कंत्राटी शेतीमुळे नवीन जमीनदारी पद्धतीला चालना मिळण्याचा धोका अधिक आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. हे शेतकरी व्यापारी व उद्योगपतींच्या समोर तग धरू शकणार नाहीत. शेतकरी भांडवलदारांच्या हातचा गुलाम बनेल. यातून शेती व शेतकरी देशोधडीला लागण्याचा धोका मोठा आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे फक्त शेतकऱ्यांचेच नुकसान होणार नाही तर साठेबाजीला मोकळे रान मिळाल्यामुळे महागाई वाढून सामान्य लोकांना त्याचा फटका बसणार आहे. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- ‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- लड़ने को तुम और भाषण को हम- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
