Share

कोल्हापूरात कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : येथील सावंतवाडी आगार चालक कम वाहक पदावर कार्यरत असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडीली आहे. गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु आहे. या भीतीनेच ह्रदयविकाराच्या झटका आला असा आरोप या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील मडीलगे खुर्द गावचे रहिवासी अनिल मारुती कांबळे हे सावंतवाडी आगारात चालक कम वाहक या पदावर कार्यरत होते. ते २०१५ साली एसटी महामंडळात रुजू झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्यानंतर ते मडीलगे खुर्द या स्वत:च्या मुळ गावी रहायला गेले होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु असल्याने त्यांनी याची धास्ती घेतली होती, त्यातच त्यांना ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणताही तोडगा निघत नसल्याने आंदोलनकर्त्यांची उद्विग्नता वाढत चालली आहे. मागच्या आठ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र अद्याप काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरु असल्याने कर्मचारी प्रचंड तणावात असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!