Share

‘अनिल परबसारखा कार्टा आमच्या मातीतून कसा निघाला हा संशोधनाचा विषय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राजकारण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. आमदार नितेश राणे देखील एसटी कर्मचाऱ्यांसोबत आज आंदोलनात उतरले आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार जर ऐकलं नाही, तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सरकारला दिला. ‘अनिल परब सिंधुदुर्गातील आहेत, पण आमच्या मातीत हा कार्टा कसा जन्मला हेच कळत नाही. मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, मी अनिल परब यांच्या घरी नेऊन सोडतो, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

‘महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे एकटे नाहीत हे सांगण्यासाठी आलोयं, भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे. सदाभाऊ खोत यांना फार मच्छर चावतात असा इंटरव्यू चालवला. सदाभाऊंना मला सांगायचंय दोन तीन मच्छर बाटलीत भरुन द्या, अनिल परब यांच्या घरी ते सोडायचेत. जेणेकरुन मच्छर कसे चावतात हे त्या कारट्याला कळेल. तो मूळ तसा आमच्या सिंधुदुर्गचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा कार्टा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मानेवर कसलीशी सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला आहे. फक्त ठाकरे लावले म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेब कुठे तू कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचं रक्त येत नाही. रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नको अशी जहरी टीकाही नितेश राणे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!