मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येणाच्या चर्चांनी जोर धरला होता. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळेही या चर्चेला उधाण आलं होतं. आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शेलारांनी राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर भाजप आणि मनसेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं.
अनेकजण मागील काही काळापासून मनसे आणि भाजपचे सूर बदलले असल्याचंही म्हणत आहेत. या तर्कवितर्कांनंतर आशिष शेलार यांना राज ठाकरेंच्या भेटीविषयी विचारणा केली असता त्यांनी या भेटीचा उद्देश सांगितला. तसेच भेटीत राज ठाकरे यांना पुस्तकही भेट दिल्याचं सांगितलं आहे.
मी पेंग्विन प्रकाशनाचं ‘बूक ऑन मुव्ही’ हे छानसं पुस्तक राज ठाकरे यांना भेट दिलं. त्यात जगभरातील १०० प्रसिद्ध चित्रपटांविषयी माहिती आहे. मी स्वतः हे पुस्तक पाहिलं होतं आणि आवडलं होतं. त्यामुळे या दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांच्याशी भेटायचं ठरलं तेव्हा मी हे पुस्तक भेट दिलं. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ही भेट केवळ आणि केवळ दिवाळीच्या शुभेच्छांचीच होती. या भेटीत या पलिकडे काहीही नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस आली नाही; चंद्रकांत पाटलांचा टोला
- ‘ज्यांना काही समजतच नाही अशी मंडळी…’, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘…तर डोक्याविना संजय राऊत दिसतील तिथे’, नारायण राणेंचा खोचक शब्दांत इशारा
- मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि तो संकटात आल्यावर त्याला उघड्यावर सोडायचे – गोपीचंद पडळकर
- समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; बनावट प्रमाणपत्रे दावून नोकरी बळकावल्याची भीम आर्मीची तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
