🕒 1 min read
रत्नागिरी : शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली. मग ही माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळजनक दावा मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेतून केला होता.
या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कदम यांनी वैभव खेडेकर यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मी वाघासारखा समोरून वार करणारा आहे. अनिल परब हे मंत्री आहेत, त्यामुळे असले आरोप करणाऱ्यांना किंमत नाही,’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला. दापोलीचा प्रसाद कर्वे हा सेनेचा कार्यकर्ता आहे, हे मला मान्य आहे. पण त्याने माझ्या भावाच्या हॉटेलविरोधातही तक्रार केली होती. तेव्हा त्याला आपण विचारणा केली होती. त्याने केलेली तक्रार हा त्याचा स्वतंत्र विषय आहे. त्याच्याशी माझा काहीएक संबंध नाही, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
‘किरीट सोमय्या यांना भेटून अनिल परब यांच्या हॉटेलची तक्रार केली हा जावई शोध वैभव खेडेकर यांनी लावलेला दिसतो. रामदास कदम कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नसतो, मी सांगून समोरुन अंगावर जातो. होय! प्रसाद कर्वे यांचा माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेण्यासाठी मी उपयोग करुन घेतला. बाकी माझा व त्यांचा कोणताही संबंध नाही. फक्त आमच्या परिवारात भांडणे लावण्यासाठी हे कट कारस्थान आहे. मी कडवा शिवसैनिक आहे. मी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे असे स्वप्न वैभव खेडेकर यांना पडले असावे असा टोला कदम यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
