🕒 1 min read
बीड : खूप दिवसांपासून मी एकटीच काम करतेय. तरीही कोणीही येतेय आणि मलाच बोलतेय. त्यामुळे आता बस्स झालं. मला खूप त्रास होतोय, म्हणून मी नोकरी सोडतेय, असा हस्तलिखित अर्ज महिला डॉक्टरने मॅग्मो संघटनेच्या सोशल मीडियावरील ग्रुपवर टाकला आहे. गेवराई तालुक्यातील जातेगाव ग्रामस्थांबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला. या प्रकाराने डॉक्टरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डॉ. पल्लवी झोडपे असे या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. जातेगाव (ता.गेवराई) आरोग्य केंद्रात त्या कार्यरत आहेत. येथील दुसरे वैद्यकीय अधिकारी आजारी रजेवर होते. त्यामुळे अनेक महिने झोडपे यांनी एकटे सर्व कामकाज सांभाळले. दरम्यान, सततच्या त्रासाला वैतागून त्या नोकरी सोडण्याच्या निर्णयापर्यंत आल्या आहेत.एका शिक्षकाने ‘तुम्हीच इंजेक्शन द्या’ म्हणत वाद घातला. त्यानंतर त्या शिक्षकाने त्याच्या भावालाही बोलावून घेत दमदाटी केली.
या प्रकारानंतर त्यांनी या त्रासला वैतागून त्यांनी नोकरी सोडणार असल्याचा हस्तलिखित अर्ज संघटनेच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर टाकला. दरम्यान, येथे काम करताना त्रास होतो. अद्याप मी राजीनामा दिलेला नाही, मात्र संघटनेच्या ग्रुपवर सर्व प्रकार कळवला असल्याचे डाॅ. झोडपे म्हणाल्या. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टरांनी समोर येऊन हा काेरोना विरुद्धचा लढा जवळपास यशस्वी केला असून असे असभ्य वर्तन करणे योग्य नाही, डॉक्टरांना सन्मानाची वागणूक दिली जावी, असे यानिमित्त काही सुज्ञ नागरिकांनी आपले मत व्यक्त केले
यामुळे मी नोकरी सोडत आहे
मी दोन वर्षांपासून जातेगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मला लहान बाळ आहे. ते बाळ तुम्ही सोबतच का आणता, या मुद्द्यावरून अनेकदा वाद घातले. तसेच शनिवारीही एका शिक्षकाने तुम्हीच इंजेक्शन द्या, असा हट्ट धरला. परिस्थितीवरून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भावाला बोलावून घेत आणखी वाद घातले. येथील ग्रामस्थांकडून सारखाच त्रास होत असल्याने मी नोकरी सोडत आहे. मी वरिष्ठांकडे आणखी राजीनामा दिला नाही, पण संघटनेच्या ग्रुपवर अर्ज टाकला आहे. – डॉ. पल्लवी झोडपे, वैद्यकीय अधिकारी जातेगाव, ता. गेवराई
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
