Share

बैलगाडी शर्यतीवरून पडळकरांचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; जयंत पाटील म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. यामुळे पोलीस आणि पडळकर यांच्यात संघर्ष निर्माण होण्यास सुरुवात झाली असून जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच असा निर्धार पडळकरांनी केला आहे.

शर्यतीला बंदी असल्याने आजपासूनच जिल्ह्यात पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. यावर पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ‘गोवंशाची शान आणि शेतकऱ्यांची ओळख असणारी बैलगाडी नामशेष करण्याचे काम हे राष्ट्रवादीकडून होत आहे. राष्ट्रवादी बळाचा वापर करून बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी नाकाबंदी करून शेतकऱ्याचा विश्वासघात करणार आहेत. याठिकाणी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तानहून कोणीही तालिबान येणार नाहीत.’ असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

‘राष्ट्रवादीला दोन वर्षात ना तारीख काढली ना अध्यादेश काढता आला. मी शर्यत घ्यायचे ठरवल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शेतकऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. राष्ट्रवादीकडून बळाचा वापर करून नाकाबंदीद्वारे शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे. जर बैलगाडी आणि शेतकऱ्यावर प्रेम असेल तर राजकारण करू नका,’ असे आवाहन देखील पडळकर यांनी केले आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत, तोवर ती सर्वांनाच लागू असतील. त्यामुळे कुठे बैलगाडा शर्यत होत असतील तर त्यावर कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!