Share

देशाने ५५ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा केला पार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत भारताने गेल्या २४ तासात ८८.१३ लाखाहून जास्त मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या आहेत. लसीकरण अभियान सुरु झाल्यापासून एका दिवसातले साध्य केलेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. याबरोबरच भारताच्या कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाने ५५ कोटीचा महत्वाचा टप्पा काल गाठला. लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याने तिसऱ्या लाटेची शक्यताही कमी होत आहे.

मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ६२,१२,१०८ सत्रांद्वारे ५५,४७,३०,६०९ मात्रा देण्यात आल्या आहेत. २१ जून २०२१ पासून कोविड-१९ सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. कोरोनातून बरे होण्याचा दर ९७.५१% झाला असून मार्च २०२० पासूनचा हा सर्वोच्च दर आहे. महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण ३,१४,४८,७५४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासात ३६,८३० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

भारतात १५४ दिवसातल्या सर्वात कमी (२५,१६६) नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. सलग ५१ दिवसांपासून ५०,००० पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!