Share

टी-२० विश्वचषकासाठी न्युझीलंडच्या संघाची घोषणा; ‘हा’ अनुभवी खेळाडू संघाबाहेर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार ही स्पर्धा पहिले भारतात खेळविण्यात येणार होती. मात्र भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे स्पर्धा युएई येथे सुरु होणार आहे.

या स्पर्धेसाठी संर्व सघ कसुन तयारीला लागले आहे. यादरम्यान या स्पर्धेसाठी न्युझीलंड क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यिय संघाची घोषणा केली आहे. टी-२० विश्वचषकासाठी संघ घोषीत करणारा न्युझीलंड हा पहिला देश ठरला आहे. या १५ सदस्यिय संघाचे नेतृत्व केन विलियमसन हा करणार आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेतील विजयी संघातील रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम आणि फिन एलन या खेळांडूना संघातुन वगळण्यात आले आहे.

या संघात डेवॉन कॉनवे, मार्टिन गुप्तिल, टीम सिफर्ट, मार्क कॅम्पमन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर टॉड एस्टल, ईश सोधी आणि मिशेल सॅन्टनर अशा तीन फिरकीपटूना संघात स्थान देण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसल, कायली जेमीसल, जिमी निशम यांचा समावेश संघात करण्यात आला आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.

न्युझीलंडचा संघ
केन विल्यमसन (कर्णधार), टॉड एश्ले, ट्रेंट बोल्ट, मार्क कॅम्पमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काईल जॅमिसन, डेर्ली मिशेल, जिमी निशाम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी, एडम मिल्ने.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!