Share

‘ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा हा मराठाच ; भेटून सन्मान करणार’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारली होती. यासह नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची आशा लागली होती. त्याने भारतीयांची आशा पूर्ण केली. आणि शनिवारी नीरज अंतिम फेरी खेळला आणि त्याने भारताला सुवर्ण पदक मिळून दिले. पुरुष भालाफेक स्पर्धेत ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा यापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो.

बुधवारी पार पडलेल्या अ गटाच्या पात्रता फेरीत नीरजने ८६.६५ मीटरपर्यंत भाला फेकत थेट अंतिम फेरीत धडक मारली. नीरजने ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होते. दरम्यान त्याने सर्वोत्तम थ्रो 87.58 मीटरचा केला. आणि भारताला तब्बल १३ वर्षान नंतर सुर्वण पदक मिळाले. त्यमुळे नीरजवर सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, आज मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समन्वयक, विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते हे या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजू, भावना ऐकून घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पुढील भूमिका जाहीर केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘ टोकियो ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा हा मराठाच आहे, मी त्याच्या घरी मी गेलो आहे. आणि आता देखील तो जेव्हा भारतामध्ये परतेल तेव्हा मी मराठा समाजाकडून त्याचा सन्मान करण्यासाठी त्याच्या हरियानातील गावी जाणार आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!