Share

भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर भालचंद्र पांडुरंग कदम हे भाऊ कदम म्हणून म्हणून लोकप्रिय आहेत. विशेषतः भाऊ कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली. झी मराठीवरील ‘चला हवा येवू द्या’ या कार्यक्रमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यांच्या विनोदी अंदाजात ते प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पडतात.

भाऊ कदम यांचे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. अशाच एका चाहत्याशी त्यांची पुण्यातील खेड शिवापूरच्या एका पेट्रोल पंपावर भेट झाली. या चाहत्याविषयी भाऊ कदम यांनी खास फेसबुक पोस्ट करत लिहिले कि, ‘आज बाहेर कामासाठी गेलो असता, रस्त्यात खेड शिवापूर च्या एक पेट्रोल पंपावर एक FAN भेटला… आणि त्याच प्रेम पाहून त्याच्यासोबत एक फोटो काढण्याचा मोह मला काही आवरला नाही…त्याने चक्क त्याच्या हातावर माझं नाव गोंदवलेलं… रंगभूमीमुळे मिळालेलं हे प्रेम मला असचं चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहिल…धन्यवाद मित्रा…’, असे म्हणत त्यांनी या चाहत्याचे आभार मानले आहेत.

https://www.facebook.com/photo.php?fbid=350765883086384&set=a.229309121898728&type=3&eid=ARAHjdUYRDONcaqe8bWgGZ6HccPsZaImaLA1i-1yFtIq_UbY4ctky1DF3XZdy3bFEX7jFjzI_R0sOkwA&__xts__%5B0%5D=68.ARDBgV6KyIYvsis-LWAzwe59u8PiCb5cqCgswG5jZKnHnXq494eOhgTNPWYFd-0F0gRA4lz32Jy1t6ez83OAtLsX9THLWAyn_nK6JgefbbeciAI4dGyCn_-EgVZr37-ejJ5DxHtZMhDK7XvrhwuTz8EtjzBVuahvhf2b_Sgdq6y-ukAIH5QxiMmTR24fMHGK-GfGK8Knqcjzm08I6an8Qed9WYcefGUzCObdLIm95QJmACQo_LHaLaJ2l8qp0a8MbllC75wy7-BeX_LVgSy6lyo6oDkxrTOKdNWoRUXDFQVUtBk238U&__tn__=EEHH-R

भाऊ कदम यांना आयुष्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागला. एकेकाळी करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअर साठी मैलाचा दगड ठरला. पुढे भाऊ ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले. चला हवा येवू द्या या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्रभूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला. आज भाऊ कदम हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले असून मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!