Share

‘खा.नवनीत राणांना मिळालेल्या सर्व सुविधा गोठणार, आर्थिक लाभांचीही वसुली होणार’

Published On: 

अमरावती : खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यावर आता त्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधाही गोठविल्या जाणार आहेत. त्यांनी उपभोगलेल्या सर्व आर्थिक लाभांचीही वसुली करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत अशी माहिती माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली.

‘खासदार नवनीत राणा यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र उच्च न्यायालयात अवैध ठरवण्यात आले. हा सत्याचा विजय होय. परंतु, ज्या मागासवर्गीयांसाठी हा मतदारसंघ त्या मतदार संघात खासदार राणा निवडणूक लढल्या. हा तर भारतीय संविधानासह मागासवर्गीयांचा अवमान आहे अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली.

अडसूळ म्हणाले, की न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिल्यानंतर खिचडी पकवण्यात आल्याचे ताशेरे खासदारांकडून ओढण्यात आले. खिचडीच पकवायची असती तर ८ वर्षे वाट बघितली नसती. ज्यांना खिचडी पकवण्याची सवय आहे, ते दुसऱ्यांना तसेच समजतात. त्यांनी सर्व कागदपत्रे बनावट सादर केली. त्यांच्या वागण्यात व बोलण्यात विसंगती आहे. मागासवर्गीयांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवणे योग्य नव्हे, असेही अडसूळ म्हणाले.

खासदार राणा या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असे कळल्यानंतर अडसूळ यांनी सुप्रीम कोर्टात ऑनलाइन कॅव्हेट दाखल केले आहे. तसेच आपण लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींकडे तक्रारीची फाइल सादर केली आहे. एवढेच नव्हे तर जात पडताळणी समितीलाही आपण सोडणार नाही, असे अडसूळ यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
खा.नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, तरी फारसा फायदा होणार नाही; मात्र तरी आपण आधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे आता न्यायालयाला आधी आपलीच बाजू ऐकून घ्यावी लागेल, अशी माहिती आनंदराव अडसूळ यांनी दिली.

आदेशावरील स्थगितीचा दावा खोटा
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयाने आपल्याला सहा आठवड्यांची मुदत दिली असून, तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती आहे, असा दावा खा.नवनीत राणा यांच्याकडून करण्यात येत आहे; मात्र हा दावा साफ खोटा असून, न्यायालयाने अशी कोणतीही स्थगिती दिली नाही. त्यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सुपूर्द करण्यासाठी ती सहा आठवड्यांची वेळ न्यायालयाने दिली असल्याचे स्पष्टीकरण आनंदराव अडसूळ यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!