Share

के एल राहुलने अफलातून झेप घेत षटकार रोखला ! पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारताने कसोटी मालिका ३-१ ने आपल्या खिशात घातली होती. आता, भारत आणि इंग्लंड मध्ये टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. आज पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताचा डाव गडगल्याचं दिसून आलं. सलामीवीर के एल राहुल अवघी एक धाव करून माघारी परतला. तर, कर्णधार विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला. यानंतर शिखर धवन देखील ४ धावांवर बाद झाला. तर, भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिषभ पंत देखील २१ धावांवर माघारी परतला.

यानंतर, हार्दिक पांड्या व श्रेयस अय्यरच्या जोडीने भक्कम स्थिती निर्माण करण्यासाठी फटकेबाजी केली. मात्र, हार्दिक पांड्या २१ चेंडूंमध्ये १९ धावा करून झेलबाद झाला. यानंतर, दुसऱ्याच बॉलवर शार्दूल ठाकूर देखील झेलबाद झाला. श्रेयस अय्यर देखील अखेरच्या षटकात झेलबाद झाला. भारताकडून श्रेयस अय्यरने ४८ चेंडूंमध्ये ६७ धावा करत भारताला १२४ धावांची मजल गाठून दिली. दरम्यान, इंग्लंडला विजयासाठी अवघ्या १२५ धावांची गरज आहे.

दरम्यान, हा सामना इंग्लंडच्या पारड्यात जाणार असं दिसत असलं तरी भारतीय खेळाडू इंग्लंडला रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. या सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना के एल राहुलने महत्वाचा षटकार रोखला. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र के एल राहुल बाउंड्री लाईन पार तोल जाऊन कोसळत होता. अशावेळी, त्याने षटकार रोखत वेळीच चेंडू आत ढकलला. क्षेत्ररक्षणाच्या अप्रतिम उदाहरणानंतर आता त्याची चांगलीच वाह वाह होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!