Share

MPSC:आंदोलन सुरूच राहणार,विद्यार्थ्यांसह रस्त्यावर मुक्काम ठोकणार : पडळकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले. त्यानंतर थोड्याच वेळात याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडण्यास सुरुवात झाली होती.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जनतेला संबोधन करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले कि MPSC परीक्षेची तारीख कोणत्याही परीस्थित उद्याच जाहीर होईल. तसेच तशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिलेल्या आहेत. उद्या जाहीर करण्यात येणारी तारीख ही पुढच्या आठ दिवसातीलच आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

परंतु त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर विद्यार्थ्यांसह पडळकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी दुपारी सुरु झालेले केलेले आंदोलन हे आता असेच सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना आता सांगितले आहे.

तसेच ‘आतापर्यत सरकारने पाच वेळा परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे आमचा आता सरकारवर अजिबात विश्वास उरलेला नाही. मात्र आता आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही सर्व आजचा मुक्काम इथेच ठोकणार आहोत,पोलिसांनी दादागिरी करायची असेल तर त्यांनी करावी.’ असे मत पडळकरांनी यावेळी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!