पुणे- राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे.
आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान,महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ते करत असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेवून पुण्यातील नवी पेठेत ठिय्या मांडला आहे.
ग्रामीण भागातून पुण्यात अभ्यास करण्यासाठी आलेले हजारो विद्यार्थी आज पुण्यात आक्रोश व्यक्त करत आहेत.यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे.सरकार वय वाढवून देत आहे मात्र महिनाभराचा खर्च जवळपास १० हजार रुपये असल्याने तो कसा करायचा असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर आहे.सरकारच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्याच्या समोर अंधार दाटला आहे.
दुसरीकडे दि.१५मार्च ते २५मार्च यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचीअंतिम सुनावणी सलगपणे होणार आहे.दि.२५ मार्चनंतर व कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर या परीक्षा घेतल्या तर त्याचा फायदा मराठा विद्यार्थ्यांना निश्चितपणे होणार आहे ! त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे शिवसंग्राम व आ.विनायक मेटेयांच्या वतीने स्वागत करीत आहोत असे शिवसंग्राम प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे यांनी म्हटलं आहे.
अनेक वर्षे अन्याय सहन करावा लागत असताना मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मा.मंत्री महोदयांचे आम्ही आभार मानतो.याआधीही ४ वेळा या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या ! त्यामुळे एखादा महिना आणखी पुढे गेल्याने फारसा फरक पडणार नाही. फक्त वयोमर्यादे बाबत शासनाने विद्यार्थ्यांना आश्वस्त करावे अशी विनंतीही आम्ही शासनाला करीत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
आज पुण्यात काही राजकीय नेत्यांनी व विद्यार्थी प्रश्नांचे राजकारण करणाऱ्या मंडळींनी विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचा प्रकार केला व रस्त्यावर गर्दी जमविण्याचे काम केले. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.आ.गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज जो रास्तारोको केला तिथे कोणत्याही प्रकारच्या कोरोना विषयक नियमांचे पालन करताना दिसले नाहीत. मास्क, सोशल डिस्टनसिंग हे तर कोठेही दिसत नव्हते.तरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या समंधितांवर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत असे देखील त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने दिली टीम इंडियाची सगळ्यात मोठी अपडेट
- ‘तुफान’ची रिलीझ डेट जाहीर; ‘तुफान उठेगा’ म्हणत फरहानने केले टि्वट
- लोकं काही सुधारेनात…नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर… अनेक शहरात कडक निर्बंध लागू
- बीएमडब्ल्यूने लाँच केली भारतीय बनावटीची पहिली कार
- वरळीत पब सुरू राहू शकतात मग महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा का होऊ शकत नाही ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

