Share

जायकवाडीची पाणीपट्टी थकवणाऱ्या औरंगाबाद ‘मनपा’वर कारवाई करणार कोण?

Published On: 

औरंगाबाद : शहराला जायकवाडी धरणातून पाणी उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या बदल्यात महानगरपालिकेस जलसंपदा विभागाला पाणीपट्टी स्वरूपात दरवर्षी ठराविक महसूल जलसंपदा विभागाला द्यावा लागतो. मात्र मागील काही वर्षांपासूनची पाणीपट्टी थकल्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे.

नोटीस मिळताच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टी भरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र पाणीपट्टी विहित वेळेत न भरल्यास शहरावर पाणीबाणी येऊ शकते. जलसंपदा विभागाची पाणीपट्टी थकवणाऱ्या मनपावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

औरंगाबाद शहराची लोकसंख्या आजघडीला १६ लाखांच्या घरात पोहचली आहे. ही लोकसंख्या लक्षात घेऊन जायकवाडी धरणातील पाण्याचे आरक्षण जलसंपदा विभागाने ठरवून दिले आहे. पालिकेने दर महिन्याला जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. मात्र मागील काही वर्षात पालिकेने नियमीत पाणीपट्टीचा भरणा जलसंपदा विभागाकडे केलेला नाही. त्यामुळे थकबाकी वाढतच चालली आहे.

मार्च अखेरपर्यंत थकबाकी वसूल व्हावी, या उद्देशाने जलसंपदा विभागाने पालिकेला थकबाकी भरण्याची पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. याबद्दल पालिकेचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले की, पाणीपट्टी भरण्याबद्दल जलसंपदा विभागाचे पत्र मार्च महिन्यात येते.

मात्र पालिका दर महिन्याला जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी पोटी पंधरा लाख रुपये भरणा करते. मार्च महिन्यात देखील सुमारे साडेअकरा लाख रुपये भरले जाणार आहेत, त्याची संचिका मंजूरीच्या प्रक्रियेत असून लेखा विभाग त्यावर कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांवर कारवाई करणाऱ्या मनपावर कारवाई कोन करणार?

शहरात पाणीपट्टी, मालमत्ता वसुली कराबाबत जोरदार मोहिम सुरु आहे. कर थकलेल्या नागरिकांचे नळ कनेक्शन मनपाच्या पथकाद्वारे कट केले जात आहेत. त्यामुळे इतरांवर कारवाईचा बडगा उचलतांना मागे पुढे न पाहणाऱ्या मनपावर आता कोण कारवाई करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!