परभणी : किरकोळ कारणातून शिविगाळ करीत कुऱ्हाडीने मारहाण करून पायाची बोटे तोडून एकास जखमी केल्याची घटना परभणी येथे घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी शहरामधील साखलाप्लॉट भागात राहणारे उत्तम श्याम काळे हे तीन मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांच्या भावास भेटून घरी जात होते. तेव्हा गंगाराम श्याम काळेने त्यांना अडवून, तू आणि तुझा मुलगा माजलात, असे म्हटले. त्यावेळी उत्तम काळे यांनी घरगुती वादात तू पडू नकोस, असे म्हटले असता गंगाराम काळे याने घरातील कुऱ्हाडआणून मारहाण सुरू केली. या मारहाणीत उत्तम काळे यांच्या डाव्या पायाची करंगळी व त्याजवळील बोट तुटले. या मारहाणीत उत्तम काळे हे गंभीर जखमी झाले. भांडणे सोडवण्यासाठी उत्तम काळे यांची पत्नी सुनिता उत्तम काळे, भावजय गीता शिवाजी काळे, संताबाई सीताराम काळे या आल्या.
त्यावेळी त्यांनाही शिविगाळ करीत गंगाराम काळे याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कोतवाली पोलिस ठाण्यात उत्तम काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी गुरुवारी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. अरसेवार अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार घरगुती कलहामुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचे समजते. तसेच पोलिस या बाबत सखोल माहिती घेवून चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

