परभणी : विसावाफाटा परिसरात विनामास्क फिरणार्या नागरिकाने परभणीत महापालिकेच्या कर्मचार्यास मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रिझवान खान याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोराना आणि लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर महानगर पालिका आणि प्रशासन जोमाने कामाला लागलेले दिसून येत आहे.
या प्रकरणी परभणी महापालिकेचे कर्मचारी रमेश भराडे हे पथकासह बुधवारी जिंतूर रस्त्यावरील विसावा फाटा येथे विनामास्क फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत होते. त्यावेळी एक व्यक्ती विनामास्क तेथून जात असताना भराडे यांनी त्यास विनामास्क फिरत आहात, दंड लागेल, फाईन फाडा, असे म्हटले. त्यावेळी त्याने तू मला शिकवतोस का, मास्क घालण्याबाबत मला सांगू नकोस, असे म्हणाले. त्यामुळे रमेश भराडे तसेच संबंधीत नागरिकात वाद झाला. समोरील व्यक्तीने भराडे यांना मारहाण केली. यावेळी तेथे असलेल्या स्वच्छता निरीक्षक राजू झोडपे यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी सोडवासोडव करीत मारहाण करणार्या व्यक्तीस पकडले.
त्याला नानलपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्या व्यक्तीची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ धारदार शस्त्र देखील सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव रिझवान खान (रा. दर्गारोड) असे समजले. रमेश भराडे यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून रिझवान खान याच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार चिरंजीव दलालवाड हे करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आमदार सुरेश वरपुडकरसह कुटूंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह
- मोठी बातमी : गोपीचंद पडळकरांसह पुण्यातील एमपीएससीचे हजारो विद्यार्थी आक्रमक; वातावरण चिघळले
- हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये पहिलं शाही स्नान संपन्न…
- लातूरमध्ये मद्यधुंद तरुणांचा धुडगूस, वाहनांच्या काचा फोडल्या
- उस्मानाबादेत दररोज दोन हजार चाचण्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

