🕒 1 min read
औरंंगाबाद : आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) या कार्यालयाच्या या आदेशान्वये लागू केलेले मनाई आदेश यापुढे ३१ मार्च २०२१ चे २४.०० वाजेपर्यंत लागू करीत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहील, असे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी कळविले आहे.
शासनाच्या अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड २ (१) नुसार कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महानगर पालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगर पालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रामध्ये बाजार, दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगर पालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगर पालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील. सदर आदेशाचे पालन न करणाNया व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहर भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७ (१) व (३) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक १४ मार्च २०२१ पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे, असे डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांनी कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं
- ‘तो दिवस दूर नाही…जेव्हा मोदीजी बाहेरून स्टेशन बघायचे देखील पैसे घेतील’
- मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विरोधकांचा गोंधळ, एकेरी उल्लेखावरुन देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
