Share

विविध घटनेत गुन्हे दाखल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : दौलताबाद येथील विटभट्टीजवळ मुंबई कल्याण जुगार खेळना-या नितीन अशोक किर्तीकर (वय २३, रा. दौलताबाद) याला पोलिसांनी गजसाड केले. ही कारवाई १ मार्च दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. जुगार खेळणा-याविरूध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत स्लाईडींग खिडकीतून काठीच्या सहाय्याने रूममध्ये टांगलेले कपडे चोरट्याने चोरून नेले. ही घटना २७ पेâब्रुवारीच्या रात्री बीडबायपास रोडवरील साईनाथनगर येथे घडली. याप्रकरणी मधुसूदन वसंतराव चितळे (वय ६७, रा.साईनाथनगर, बीड बायपास रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला तीन वेळेस तलाक हा शब्द उच्चारून पतीने तलाख दिला. याप्रकरणी तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तलाक देणा-या आरिफ शेख शब्बीर शेख याच्यासह चार जणांविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथ्या घटनेत नवीन प्लॉट घेऊन घराचे बांधकाम करण्यासाठी ७ लाख रूपये आण म्हणून विवाहितेचा छळ करणाNया राहुल उबाळे याच्यासह दोन जणांविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसNया घटनेत, माहेराहुन दोन लाख रूपये आण म्हणत विवहितेचा छळ करणा-या नईम इनामदार याच्यासह चार जणांविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचव्या घटनेत एमआयडीसी सिडको परिसरात राहणा-या अल्पवयीन मुलीला फोन तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नवनाथ म्हस्के (रा.वाळूज, ता.गंगापूर) याच्याविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!