Share

भाजपचे राज्य सरकार विरोधात तर शिवसेनेचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

जालना : जिल्ह्यात शुक्रवारचा दिवस अनोख्या अंदोलनाचा ठरला. एकाच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने वेगवेगळ्या कारणासाठी आंदोलन केले. इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेने केंद्र सरकार विरोधात सायकल मोर्चा काढला. तर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने वीज बिलासाठी राज्य सरकारविरोधात आंदोलन केले.

इंधन दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने तहसील कार्यालयावर सायकल मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. पेट्रोल डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झालेच पाहिजेत अन्यथा गंभीर परिणाम केंद्र सरकारला भोगावे लागतील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी यावेळी दिला. यावेळी तहसील कार्यालयात तहसीलदार सुमन मोरे यांनी निवेदन स्वीकारले, यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यांना सायकल भेट देण्यात आली.

तर दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्ष भाजपने जालना शहरातील मस्तगड येथील विद्युत वितरण कार्यालयासमोर वाढीव वीज बिला विरोधात आंदोलन केले. यावेळी ठाकरे सरकार व उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत आणि कार्यकर्ते होते. जिल्ह्यात भोकरदन आणि तिर्थपुरी  येथे उपकार्यकारी अभियंते यांना भाजप नेते कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि वीज बिल माफ करावे आणि बील वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अशा मागण्याचे निवेदन दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!