🕒 1 min read
नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 11 बैठका होऊन सुद्धा आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. सरकार चर्चेची दारं खुली असल्याचं सांगत आहे मात्र कायदे मागे घेण्याबाबत अजिबात तयार नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला या कायद्यांना विरोध करणारे शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीपासूनच या आंदोलनाच्या समर्थनार्थ काही सेलिब्रिटी पुढे आले होते. आता या देशी सेलिब्रिटीज बरोबर काही परदेशी सेलिब्रिटी सुद्धा समर्थनार्थ पुढे आले आहेत.पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, पर्यावरण चळवळीतली आघाडीची कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्याने मोदी सरकार हादरले. शेतकरी आंदोलनाचा हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर त्यांच्या विरोधात भाजप सरकार आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, जगभरात लोकप्रिय ठरलेला टीव्ही शो ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ (Man Vs Wild) चा होस्ट बेअर ग्रिल्सने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर करत टि्वट केले आहे. माझ्या आवडीच्या फोटोंपैकी हा एक. डिस्कव्हरीवर आमच्या जंगल ऍडव्हेंचरदरम्यान भिजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चहा प्यायलो होतो. मास्क आणि पदाच्या मागे आपण सर्वजण एकसारखे आहोत, हे हा क्षण पाहिल्यानंतर लक्षात येते, असे बेअर ग्रिल्सने आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थन आणि विरोधात मोठी चर्चा घडत असतानाच बेअर ग्रिल्सने हे टि्वट केले आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी रिहानाच्या टि्वटनंतर देशातील अनेक दिग्गजांनीही या विषयावर टि्वट केले. अशातच बेअर ग्रिल्सच्या टि्वटचे वेगळे अर्थ काढले जात आहे. परंतु, मॅन व्हर्सेस वाइल्डच्या बेअर ग्रिल्सने शेतकरी आंदोलनावर मात्र कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
One of my favourite photos: soaking wet and sharing a cup of tea with Prime Minister Modi after our @Discovery jungle adventure together. This moment reminds me of how the wild is the ultimate leveller. We are all the same behind the titles and masks. #adventureunitesus pic.twitter.com/9EQPAeUOLO
— Bear Grylls OBE (@BearGrylls) February 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- फिर्याद देण्यासाठी करावा लागतो ४० किमी चा प्रवास; २६ गावांचा भार २ पोलीस कर्मचाऱ्यावर
- शरजिल उस्मानीवर कारवाई करा; महाराष्ट्र भाजप योगी दरबारी
- गोवऱ्यांवर स्वयंपाक करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन
- विराट कोहली, रोहित शर्माच्या ‘या’ फोटोवर पडतोय मिम्सचा पाऊस
- ‘कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या भारताच्या कामगिरीसाठी डब्लूएचओने थोपटली पाठ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
