🕒 1 min read
मुंबई : एल्गार परिषदेतील आपल्या भाषणात शरजील उस्मानी याने ‘हिंदू समाज सडका झालाय’ अशा प्रकारच वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. शरजिल उस्मानी याने भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केल होत.
शरजीलच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राजकीय नेत्यांनी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भाजप या मुद्दावर आक्रमक असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेच तक्रार केली आहे.
यातच एनआयए वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी यांच्या विरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
A case has been registered against Sharjeel Usmani at Lucknow's Hazratganj Police Station in connection with his speech at Elgar Parishad, in Pune Maharashtra.
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 4, 2021
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मविआ सरकारवर टीका केली असून राज्यात येऊन कोणीही हिंदुंना काहीही बोलत आहे. राज्यात केवळ महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे हिंदूंना वाली नाही. सरकार काही करणार आहे की नाही? असा सवाल पाटील यांनी केला होता. हिंदुत्वावर टीका करणाऱ्या शरजील उस्मानी याच्याविरोधात महाराष्ट्रानंतर आता लखनऊमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्याच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
अशातच आजच्या सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणविसांना खोचक आश्वासन देत ‘शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केली !’ अस म्हणत महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेडय़ा पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. असे आश्वासन देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणार नाही’
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

