🕒 1 min read
सिंधुदुर्ग:- राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. तर वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडू केला जात आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले आहे. महाविकास आघाडीने भाजपला दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोव्हिन अॅपच्या बिघाडामुळे लसीकरणात अडचणी
- राधाकृष्ण विखेंच्या भाचीने राष्ट्रवादीच्या गडाला दिला हादरा; काकडीमध्ये भाजपची सत्ता
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामकरणातील योद्ध्यांचा आठवले करणार सत्कार
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी आक्रमक
- परभणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत झरीवर शिवसेनेचे वर्चस्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
