🕒 1 min read
Jayant Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच मुंबईमधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
“निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे,” अशा कॅप्शनसहीत जयंत पाटलांनी बातमीची कात्रणं शेअर केली आहेत.
निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे. pic.twitter.com/DY9EQhJYFY
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 11, 2022
“एकीकडे मुख्यमंत्री जनता आपल्यासोबत असल्याचा दावा करतात. दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक आमदार आणि खासदाराला वाय प्लस सुरक्षा पुरवतात. जनता त्यांच्यासोबत असेल तर त्यांना नेमकी कशाची भीती वाटते?”, असा सवाल जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून केला. निर्भया फंडातून खरेदी केलेली वाहने तातडीने पोलिस ठाण्यांना परत करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
“निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते,” असंही जयंत पाटील म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | चंद्रकांत पाटील यांच्या विषयी केलेलं ‘ते’ ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं डिलीट; चर्चांना उधाण
- Ajit Pawar | “मी कधीतरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना नक्की विचारेन की…”; अजित पवारांची बोचरी टीका
- Rohit Pawar | “चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य योग्य नव्हतंच, पण शाईफेक…”; रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
- Ishan Kishan | बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावत इशान किशनने मोडले ‘हे’ विक्रम
- IND vs BAN | इशान किशन आणि विराट कोहलीने रचला ‘हा’ विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
