Share

Rohit Pawar | “चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य योग्य नव्हतंच, पण शाईफेक…”; रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | मुंबई : भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात असतानाच शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर एकाने अचानक शाईफेक (Ink Throwing) केल्याने एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याचा निषेध रोहित पवारांनी केला आहे. “चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचारांच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे”, असं रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी ११ पोलिसांना निलंबित केलं आहे. त्यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, पोलिसांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य काय?

“कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही, तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत”, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!