Share

Ishan Kishan | बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावत इशान किशनने मोडले ‘हे’ विक्रम

Published On: 

Ishan Kishan | चट्टोग्राम : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे खेळला गेला. भारतीय संघ या मैदानावर पहिल्यांदाच सामना खेळला आहे. 2007 मध्ये भारतीय संघाचा या मैदानावर खेळण्याचा मुहूर्त ठरला होता मात्र, पावसामुळे एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करावा लागला होता. आता अनेक वर्षांनी भारतीय संघ जेव्हा या मैदानावर खेळण्यासाठी उतरला तेव्हा अकरा वर्षानंतर भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात काही गोष्टी बघायला मिळाल्या.

बांगलादेशविरुद्धच्या झालेल्या या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा युवा सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) ने अनेक इतिहास रचले आहेत. इशान किशन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने फक्त 126 चेंडूमध्ये 200 धावा पूर्ण केल्याआहेत. या खेळीमध्ये इशानने 23 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहेत. या खेळीनंतर इशान किशनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इशान किशनच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतक केले होते. मात्र, या युवा फलंदाजाने फक्त 126 चेंडूमध्ये द्विशतक झळकावले आहे. इशान किशनने तब्बल 131 चेंडूमध्ये 210 धावा केल्या आहेत.

इशान किशनने हे द्विशतक करत रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. इशान हा विक्रम करत असताना 24 वर्ष व 145 दिवसांचा असताना रोहित शर्मा हा पराक्रम करताना 26 वर्ष 178 दिवसांचा होता. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या या मालिकेमध्ये दुसरा सामना सुरू असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला होता. दरम्यान, रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशनची निवड करण्यात आली होती. इशान किशनने या संधीचे सोने करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून 50+ धावा करणाऱ्या इशान दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. याआधी गौतम गंभीरने हा पराक्रम केला होता.

या खेळीनंतर ईशान किशन जगातील पहिलाच खेळाडू आहे, ज्याने शतका वर न थांबता थेट द्विशतक केले आहे. त्याचबरोबर पहिल्या तीस षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा किशन हा जगातील आणि भारतातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!