🕒 1 min read
Ajit Pawar | पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) पार पडलं. नागपूर ते शिर्डी हा टप्पा आता सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या दोघांच्या फोटोचे बॅनर संपूर्ण नागपूरात लावलेले आहेत. त्यामुळे समृद्धीचं श्रेय घेण्यावरून दोघांमध्ये चढाओढ असल्याचं चित्र दिसत आहे. याबाबत विचारणा केली असता अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“समृद्धीचं श्रेय घेण्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये स्पर्धा असेल असं मला काही वाटत नाही”, असं ते म्हणालेत. कारण दोघांनी एकत्रच पंतप्रधानांना आमंत्रण दिलं. दोघांनी एकत्रच रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी ड्रायव्हिंगचं काम देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं होतं. त्यात गाडीचा वेगही १५० पर्यंत होता. गाडी कुणाची वगैरे हा वेगळा विषय आहे”, असं म्हणत अजित पवारांनी या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
पुढे ते म्हणाले, “मलाही कधीकधी प्रश्न पडतो की मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग १००, दुसऱ्या कुठल्या रस्त्यावर गाडीचा वेग ८० आणि समृद्धी महामार्गावर गाडीचा वेग १५०. एवढी तफावत आहे. तिथे कुठल्या निकषांवर ही वेगवेगळी वेगमर्यादा घालण्यात आली? पण कधीतरी चर्चा निघेल, तेव्हा मी नक्की विचारेन की यामागचं नेमकं गमक काय आहे?”
“मी कधीतरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना नक्की विचारेन की लोकांनी नक्की काय समजावं? उद्या कुणी यावर न्यायालयात गेलं, तरी तिथे उत्तर द्यावं लागेल”, असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमनातरी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य योग्य नव्हतंच, पण शाईफेक…”; रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
- Ishan Kishan | बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावत इशान किशनने मोडले ‘हे’ विक्रम
- IND vs BAN | इशान किशन आणि विराट कोहलीने रचला ‘हा’ विक्रम
- IPL 2023 | ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना आयपीएल 2023 खेळायची नाही इच्छा
- Health Tips | थंडीमध्ये पचनाचा त्रास होत असेल, तर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
