🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा हक्क नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोष नेहमी होतो. शिवप्रताप दिनाचे महत्व समजून घ्या. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती. तर आजच्या शिवप्रताप दिनाचे महत्व अधिक वाढले असते.”
महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात कसे?, असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय. मुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. शिवरायांचा अपमान करुन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील त्यांच्या जाग्यावर बसले आहेत. हे लोक त्यांचे समर्थन करतात. अशा मुख्यमंत्र्यांनी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना गडावर जाऊन अभिवादन करण्याचा अधिकार नाही”, असंही संजय राऊत म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | निवडणुका लागू दे…जनता योग्य जागा दाखवेल ; वाचाळवीर मंत्र्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया!
- Eknath Shinde | शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाला उदयनराजेंच्या अनुपस्थितीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांवर अजित पवार भडकले ; म्हणाले,
- Amol Mitkari | “मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले” ; अमोल मिटकरी यांची टीका
- Mangalprabhat Lodha | मंगलप्रभात लोढा यांचं शिवरायांबाबतच्या केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
