🕒 1 min read
Chhagan Bhujbal | मुंबई : संजय राऊत यांनी 30 मार्च 2018 मध्ये बेळगावात भाषण केलं होतं. त्याच भाषणात त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. यावरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावर राष्ट्रावादी काँग्रेस (NCP) पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांच्या वर हल्ला चढविण्यासाठी बोलावलं जातं ही शक्यता नाकारता येत नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचे बोलले जात आहे. छगन भुजबळ यांनी देखील सीमा प्रश्नाच्या संदर्भात यापूर्वी अनेक आंदोलन केले आहे, त्याप्रकरणी त्यांच्यावर पोलीसांनी कारवाई देखील केली होती.
भुजबळ यांनी वेशभूषा बदलून बेळगावमधून प्रवेश केला होता. त्यामुळे कर्नाटकमध्ये संजय राऊत जात असतांना त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे.
बेळगावातील स्थानिक पोलिसांनीच संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. बेळगाव-महाराष्ट्र सीमावादावरुन दोन्ही राज्यांमधील राजकीय वातावरण तापलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा सांगितलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांकडून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आलाय. असं असताना राऊतांना कोर्टाचे समन्स आल्याने विविध चर्चांना उधाण आलंय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेलं वक्तव्य चार दिवसांपूर्वीच आहे. सोलापूर सांगलीचा भाग कर्नाटकात घेण्यासंदर्भात. त्यांनी विषयाला तोंड फोडलं. आमच्यासारख्या लढणाऱ्या लोकांना बेळगावात बोलावून हल्ला करण्याचं कारस्थान आहे. हे कारस्थान शिजताना दिसतं. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Xiaomi 13 Series | ‘या’ दिवशी लाँच होणार Xiaomi 13 सिरीज
- Sanjay Raut | “आता पुन्हा आसामला जाऊन नवस करणार का?”; सीमावादावरून संजय राऊतांचा शिंदे सरकारला सवाल
- Sanjay Raut | “महाराष्ट्र सरकारमधल्या लोकांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय…”; संजय राऊत यांचं मोठं विधान
- Kiwi Fruit | हिवाळ्यामध्ये किवी खाऊन रहा ‘या’ आरोग्याच्या समस्यांपासून दूर
- Sushma Andhare | “देवेंद्रभाऊ करे तो रासलीला, हम करे तो…”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
