🕒 1 min read
Ambadas Danve | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे शिंदे गटातील आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत, यावर बोलताना दानवे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केलीय.
ते म्हणाले, “मला असं वाटतं वीर सावरकर असो किंवा शिवसेनाप्रमुख असो यांचं हिंदुत्व भाजपा जे शिवसेनेतून ४० गद्दार फुटले त्यांना सांगत असेल, तर मला वाटतं हेच हास्यास्पद आहे. तुम्ही ४० जण शिवसेनेत होता, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारं आहे.”
या देशात हिंदू म्हणून सन्मानाने जगायला, हिंदू म्हणून मतदान करायला जर कोणी शिकवलं असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. एवढं हिंदुत्वाचं आपल्याला बाळकडू मिळालेलं असताना, भाजपाच्या नेत्यांकडून हे जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील तर मला वाटतं यापेक्षा मोठं दुर्दैवं कोणतही नसल्याचं सांगत अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संध्याकाळी पाचच्या सुमारास महापौर बंगला परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत. तसेच, संध्याकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दानवेंनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
दानवे म्हणाले, “बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर कोणी प्रणाम करण्यासाठी येत असेल तर त्याचे स्वागतच आहे. परंतु ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारना केली आहे. ज्या लोकांनी बाळासाहेबांची शिवसेना गद्दारी करून तोडली आहे. ज्या भाजपाने बाळासाहेब,उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, ते गद्दार लोक आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन प्रणाम करत आहेत.” केलापण पाहिजे परंतु हे लोक दाखवण्यासाठी हे करत असल्याचं सांगत यांनी बाळासाहेबांचा विचार, संघटना तोडली असल्याचा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
- Sushma Andhare | “…त्यांच्या भात्या मधील शेवटचे शस्त्र म्हणजे ‘तुझा बाप’”, सुषमा अंधारेंच्या मुलीला आणखीन एक पत्र
- IPL 2023 | धोनी vs जडेजा वाद सुरू असताना, जडेजाची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
- Vinayak Mete | CID कडून विनायक मेटे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- IPL 2023 | बिलिंग्ज आणि कमिन्सनंतर KKR ला आणखी एक झटका, ‘या’ खेळाडूने घेतला आयपीएल न खेळण्याचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
