Share

IPL 2023 | बिलिंग्ज आणि कमिन्सनंतर KKR ला आणखी एक झटका, ‘या’ खेळाडूने घेतला आयपीएल न खेळण्याचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 IPL 2023 साठी सर्व फ्रेंचायझिंनी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सर्व फ्रेंचाईजींसाठी आयपीएल 2023 ने मिनी ऑक्शन चे नियोजन केले आहे. तर दुसरीकडे आयपीएलच्या मिनी ऑक्शन पूर्वी अनेक संघांमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) ला आणखी एक झटका बसला आहे. सॅम बिलिंग्स आणि पॅट कमिन्सने कोलकत्ता नाईट रायडर्स सोडल्यानंतर आणखी एक खेळाडू यावर्षी आयपीएल मध्ये दिसणार नाही.

आयपीएल 2023 मध्ये टी 20 विश्वचषक विजेता संघाचा खेळाडू अलेक्स हेल्स इंडियन प्रीमियर लीग मधून बाहेर पडला आहे. KKR ने मंगळवारी ही माहिती दिली. सॅम बिलिंग्स आणि पॅट कमिन्स सोबत ॲलेक्स हेल्स पुढच्या आयपीएल हंगामामध्ये दिसणार आहे. ॲलेक्स हेल्सने संघ सोडल्याची माहिती KKR ने ट्विटरद्वारे दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” वैयक्तिक आणि राष्ट्रीय संघाच्या वचनबद्धतेमुळे आयपीएल 2023 न खेळण्याचा निर्णय सॅम बिलिंग्स, पॅट कमिन्स ॲलेक्स हेल्स यांनी घेतला आहे. या तीनही खेळाडूंची निर्णयाचा आम्ही आदर करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

KKR ने आयपीएल लिलावापूर्वी तेरा खेळाडूंना सोडले आहे. आणि दुसरीकडे तीन खेळाडूंना इतर संघातून रिटर्न केले आहे. शार्दुल ठाकूर रहमानउल्ला गुरबाज आणि लॉकी फर्ग्युसन यांना ट्रेड विंडो मधून खरेदी केले आहे.

तर दुसरीकडे पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, आरोन फिंच, अॅलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन हे खेळाडू सोडले आहेत.

KKR मध्ये आता सध्या श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग हे खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!