🕒 1 min read
Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्या लेकीला एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र प्रचंड जोरदार व्हायरल झालं होतं. अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा प्रवेश अंधारे यांना शह देण्यासाठी असल्याचं म्हटलं जात आहे. एवढंच नाही तर वाघमारे यांनी देखील अंधारेंना पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी त्यांच्या लेकीला पत्र लिहिलं होतं. याच पत्राला उत्तर देत सुषमा अंधारे यांच्या भावाने देखील भाचीसाठी पत्र लिहिलं आहे.
प्रा. शिवराज बांगर पाटील असं सुषमा अंधारे यांच्या भावाचं नाव आहे. पाटील हे बीड येथील रहिवासी आहेत. आज तुझ्या आईवर वैयक्तिक हल्ले करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यांच्या भात्या मधील शेवटचे शस्त्र म्हणजे “तुझा बाप”. हेच अस्त्र या व्यवस्थेने खूप लवकर तिच्यावरती वापरलेय. तुझ्या बापालाही आम्ही जवळून ओळखतो. त्याची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक उंची आम्हाला माहीत आहे, असा भाव पाटील यांनी पत्रात व्यक्त केला आहे.
काय म्हटलं आहे पत्रात –
प्रिय,
कबीरा सुषमा अंधारे हिस…..
बाळा मी ना तुझ्या आईच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, ना तुझ्या आईचा. परंतु तुझी आई ज्या पद्धतीने एका नाकारलेल्या व्यवस्थेतून बाहेर पडून स्वतःचे व्यक्तिमत्व आणि अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे “ही खरंच आम्हा भटक्याच्या लेकरासाठी अभिमानाची गोष्ट आहे”.
मी तुझ्या आईच्या अनेक भूमिका पाहिल्या तिने कधीच आपल्या तत्त्वासोबत तडजोड केलेली मला आज पर्यंत जाणवली नाही, ती शब्दात कुणाला सापडत नाही, की सीबीआय, ed तिचं काय बिघडवू शकत नाही.
बाबासाहेबांच्या विचाराची धगधगती मशाल घेऊन महाराष्ट्रातील राजकिय जळमट जाळण्यासाठी निघाली आहे….
ज्या ज्या वेळेला आमच्यासारखे चळवळीतील लोक अडचणीत आले तेव्हा ती आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आली आहे..
आज तिच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यांच्या भात्या मधिल शेवटचे शस्त्र म्हणजे “तुझा बाप” हेच अस्त्र या व्यवस्थेने खूप लवकर तिच्यावरती वापरलेय. तुझ्या बापाला ही आम्ही जवळून ओळखतो त्याची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक उंची आम्हाला माहित आहे.
परंतु “केवळ सुषमा अंधारे चा पती” म्हणून काल मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहण्याचा बहुमान मिळाला…..
तू एक विचार कर आज जर तुझा बाबा सुषमा अंधारे चा पती नसता आणि तो एखाद्या शेतामध्ये काम करणाऱ्या सामान्य भगिनी चा पती असतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांने त्याला बोलावलं असतं का?
आम्ही आनंदी असतो कधी काळी ज्या जोडीदाराने आम्हाला नाकारलेले आहे आज तेच आमच्या यशाच्या कडेला धरून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहतात आणि लोक त्यांना केवळ आमचे जोडीदार म्हणून जवळ करतात.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संपवण्यासाठी कुठलीच बाजु शिल्लक नसते त्यावेळेला त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, त्याच्या वैयक्तिक प्रश्नांचा बाजार हे राजकीय मंडळी मांडतात या सर्व घटना मी स्व्तः सहण केल्या आहेत.
आज ज्या धिराने आणि समर्थपणे तुझी आई सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहे, निश्चितच बहीण म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे.
येणारा काळ हा जेवढा संधीचा आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त संकटांचा आहे, तुझ्या आईच्या आयुष्यातील शेवटचे सुख आणि दुख व्यक्त करण्याचे व्यासपीठ तू आहेस. ज्या कष्टाने तुला ती वाढवत आहे, उभा करत आहे याची जाणीव तुला असायला हवी म्हणून हा शब्द प्रपंच आहे.
बाकी तुझी आई एक “रणरागिणी आहे” या नथी मधुन केलेल्या वाराला ती कधीच भीक घालणार नाही, तिच्या लढ्यामध्ये आमच्यासारखे पक्ष संघटना सर्व सोडून, लाखो भाऊ पाठीशी उभा आहेत. फक्त तू तिची काळजी घे एवढीच
तुझ्याकडून अपेक्षा….
तुझा मामा,
प्रा. शिवराज बांगर पाटील.
बीड…
महत्वाच्या बातम्या :
- Vinayak Mete | CID कडून विनायक मेटे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- IPL 2023 | बिलिंग्ज आणि कमिन्सनंतर KKR ला आणखी एक झटका, ‘या’ खेळाडूने घेतला आयपीएल न खेळण्याचा निर्णय
- Sharad Pawar | राष्ट्रवादीला राम राम ठोकत शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता करणार शिंदे गटात प्रवेश
- Mohan Bhagwat | “भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदूच” ; मोहन भागवत यांचे वक्तव्य
- Amol Kirtikar | “वडीलांनी साथ सोडली असेल पण मी मरेपर्यंत उद्धव-आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहणार” – अमोल कीर्तिकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

