Share

Chitra Wagh | “जितेंद्र आव्हाडांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही” ; चित्रा वाघ यांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh | मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तीन दिवसांत आपल्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाचा एफआयआर दाखल केला होता. आव्हाडांवर ३५४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मुंब्रा येथे नवीन पुलाचे उद्घाटन होत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या उद्देशाने स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या आरोपामुळे जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आव्हाडांवर टीका केली आहे.

“माझा संविधानावर विश्वास आहे, असे जितेंद्र आव्हाड नेहमी म्हणतात. मग त्यांना वाटत असेल गुन्हा केलेला नाही, तर त्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवावा. आता गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे पोलीस तपास होईल. आमदारकीचा राजीनामा देऊ, असं म्हणून पोलिसांवर जर दबाव आणण्याचा प्रयत्न असेल तर ते कधीही शक्य होणार नाही. ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असे चित्रा वाघ (Chitra Wagh म्हणाल्या.

हर हर महादेव या मराठी चित्रपटाच्या वादात आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. चित्रपटात काही तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस या चित्रपटाला सातत्याने विरोध करत आहे. याच प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच चित्रपटाता शो बंद करण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा आरोप आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलिसांनी माझ्यावर ७२ तासांत २ खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध मी लढणार आहे. मी आमदार पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या आपण पाहू शकत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!